FERVENT-1 क्लिनिकल संशोधन अभ्यास काय आहे?

सध्या, आम्ही रक्तसंक्रमणावर अवलंबून नसलेल्या बीटा-थॅलेसेमियासाठी संभाव्य उपचार विकसित करण्यावर काम करत आहोत. FERVENT-1 हा एक क्लिनिकल संशोधन अभ्यास आहे ज्याचा उद्देश रक्तसंक्रमणावर अवलंबून नसलेल्या बीटा-थॅलेसेमिया असलेल्या प्रौढांमध्ये लोहाची अतिरिक्त पातळी कमी करण्यासाठी तपासणी उपचाराची परिणामकारकता आणि सुरक्षिता यांचे मूल्यांकन करणे हा आहे.  

अभ्यास उपचार काय आहे?

तपासणी उपचार:
हा उपचार एक मोनोक्लोनल अँटीबॉडी आहे, जो शरीरातील TMPRSS6 नावाच्या प्रोटीनला लक्ष्य करतो. हे प्रथिन साधारणपणे रक्तातील लोहाचे प्रमाण वाढवते. या प्रथिनांना तपासणी उपचाराने अवरोधित केल्याने शरीरातील अतिरिक्त लोहाची पातळ्या कमी होऊ शकतात. तपासणी याचा अर्थ हे क्लिनिकल अभ्यासाच्या बाहेर वापरण्यासाठी मंजूर केलेले नाही. 

प्लेसिबो:
प्लेसिबो हे तपासणी उपचारांसारखे दिसते परंतु त्यात कोणतेही खरे औषध नसते. प्लेसिबोपेक्षा अधिक चांगले कार्य करते की नाही हे समजून घेऊन तपासणी उपचार प्रभावी आहे की नाही हे संशोधक सांगू शकतात.

एकदा अभ्यास डॉक्टरांनी तुम्ही पात्र असल्याची पुष्टी केली की, तुम्हाला रॅंडम पद्धतीने तपासणी उपचार किंवा प्लेसिबो प्राप्त करण्यासाठी नियुक्त केले जाईल. तुमच्याकडे प्लॅसिबोवर तपासणी उपचार घेण्याची 5 पैकी 4 शक्यता असेल. 
अभ्यास उपचार त्वचेखालील इंजेक्शन (त्वचेखाली सुई) द्वारे दिला जातो.

मी सहभागी झाल्यास मला काय अपेक्षा करता येईल?

अभ्यासातील सहभाग 100% ऐच्छिक आहे (तुमच्या इच्छेनुसार). तुम्ही FERVENT-1 अभ्यासात सामील झालात तर तुमच्याकडून काय अपेक्षित आहे, तसेच तुमची भूमिका आणि जबाबदाऱ्यांची माहिती मिळेल. तुमच्या नियमित आरोग्य सेवेवर परिणाम न होता तुम्ही कधीही अभ्यास सोडू शकता.
तुम्ही अभ्यासात सहभागी झाल्यास, तुमच्याकडून काही गोष्टी अपेक्षित आहेत. यामध्ये अभ्यास भेटींना उपस्थित राहणे आणि इमेजिंग स्कॅन आणि रक्त काढणे यासारख्या विशिष्ट मूल्यांकन आणि प्रक्रियांचा समावेश आहे. तुमचा सहभाग सुमारे 22 अभ्यास भेटींसह सुमारे दीड वर्षापर्यंतचा असेल.
पात्र सहभागींना अभ्यास भेटीसाठी अभ्यास साइटवर येणे आणि जाणे या प्रवासासाठी खर्च दिला जाऊ शकतो. अभ्यास साइट कर्मचारी तुम्हाला तुमच्या देशात आणि अभ्यास साइटमध्ये मंजूर केल्यानुसार खर्च देण्याबद्दल अधिक माहिती प्रदान करतील.

मला कसे सहभागी होता येईल?

तुम्हाला FERVENT-1 क्लिनिकल अभ्यासात, सहभाग घ्यायचा असेल, तर तुम्ही पात्र आहात की नाही हे पाहण्यासाठी तुम्ही एक लहान प्री-स्क्रीनर प्रश्नावली भरू शकता.

मला आणखी काय माहीत असले पाहिजे?

सर्व औषधांप्रमाणे, तपासणी उपचार घेत असताना काही संभाव्य धोकेदेखील आहेत. तुम्ही पात्र ठरल्यास आणि सहभागी होण्याचे निवडल्यास, तुम्हाला एक माहितीपूर्ण संमती फॉर्म प्रदान केला जाईल जो कोणत्याही संभाव्य जोखीम आणि दुष्परिणामांचे स्पष्टीकरण देतो. हे देखील शक्य आहे की अभ्यास उपचार अज्ञात मार्गांनी तुमच्यावर परिणाम करू शकतात. तुमचे आरोग्य आणि सुरक्षितता हे आमचे सर्वोच्च प्राधान्य आहे आणि तुमच्या सहभागादरम्यान याचे बारकाईने निरीक्षण केले जाईल.
तुम्हाला तुमच्या नियमित तपासणीसोबत महत्त्वाच्या असलेल्या अतिरिक्त तपासण्यांचा फायदा होऊ शकतो आणि रक्तसंक्रमणावर अवलंबून नसलेल्या बीटा-थॅलेसेमिया तज्ञांपर्यंत पोहोचू शकता. या अभ्यासात सहभाग घेतल्याने तुम्हाला वैद्यकीय लाभ मिळेल याची कोणतीही हमी नाही. तुमची स्थिती चांगली होऊ शकते, तशीच राहू शकते किंवा आणखी वाईट होऊ शकते. तुम्ही कोणत्याही कारणास्तव आणि कोणत्याही वेळी अभ्यासातून माघार घेण्यास मुक्त आहात.

तुमच्या जवळपासची एक अभ्यास साइट शोधा

FERVENT-1 क्लिनिकल अभ्यासाबद्दल अधिक जाणून घेण्यासाठी आणि ते तुमच्यासाठी योग्य आहे का, कृपया तुमच्या जवळच्या अभ्यास साइटशी संपर्क साधा – त्यांना मदत करण्यात आनंद होईल.

तुमची जवळची अभ्यास साइट शोधा

mrMarathi
How valuable was the information provided on our site for you?
😔 😀
Please check if you would like to answer more questions about website user experience